केतकर हे महाराष्ट्राचे रेनेसाँ व्यक्तिमत्त्व आहे - मानवी अस्तित्वाचा जैवउत्क्रांतीपर व पर्यायाने सामाजिक राजकीय वेध घेणारे!
त्या वेळेचा ‘मटा’ हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक मापदंड होता व मध्यमवर्गीयांच्या तथाकथित बुद्धिमत्तेचे गंडस्थळ. केतकर हे त्याचे अनभिषिक्त सम्राट होते. त्यावेळचे ‘मटा’चे प्रत्येक पान संकल्पना, सुसूत्रता व एका अमूर्त समग्रतेने भरलेले असे. त्यातील अदृश्य हात हा संपादकांचा असतो, हे हळूहळू लक्षात येऊ लागले होते. अग्रलेखातील वा विचारातील मांडणी व त्याचा सर्वसमावेशक वैश्विक दृष्टिकोन कोणीही सहजासहजी नाकारू शकत नसे.......